भाषेचे प्रयोग व प्रकार (Voice And Its Types)

bhasheche prayog

भाषेचे प्रयोग व त्याचे प्रकार (Voice And Its Types)

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मराठी व्याकरणातील भाषेचे प्रयोग व प्रकार यांचा या घटकावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या किमान तीन ते चार असते. भाषेचे प्रयोग व प्रकार अभ्यासताना खालील महत्वाच्या घटकांचा त्यात समावेश असणे आवश्यक असते. मराठी व्याकरणात वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या एकमेकांमधील परस्पर संबंधाला भाषेचे प्रयोग असे म्हणतात.

  • प्रयोग – वाक्याचे महत्वाचे घटक तीन आहेत. कर्ता, कर्म व क्रियापद, क्रिया करणारा कर्ता, ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म.कर्ता व कर्म ह्यांचा क्रियापदाशी संबंध असतोच. हा संबंध कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग, वचन, पुरूष ह्या संदर्भात असतो.
  • क्रियापदाचे कार्त्याशी किंवा कर्माशी येणारा संबंध म्हणजेच प्रयोग होय.

मुख्य भाषेचे प्रयोग व प्रकार तीन आहेत :

  • कर्तरी प्रयोग
  • कर्मणी प्रयोग
  • भावे प्रयोग

१. कर्तरी प्रयोग :

  • अ) कर्तरी प्रयोगात कत्त्याची विभक्ती प्रथमा असते.
  • ब) कर्माची विभक्ती द्वितीया असते.
  • क) कर्त्याच्या लिंग, वचनाप्रमाणे क्रियापद बदलते. 
कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार : अ) सकर्मक कर्तरी ब) अकर्मक कर्तरी
अ) सकर्मक कर्तरी प्रयोग –
  • कर्तरी प्रयोगात जर कर्म असेल तर तो सकर्मक कर्तरी प्रयोग होय.कर्त्याच्या लिंग प्रमाणे क्रियापद बदलते.
उदा :
  1. अनिल पुस्तक वाचतो.
  2. संगीता पुस्तक वाचते.
  • कर्त्याच्या वचनाप्रमाणे क्रियापद बदलते.
उदा :
  1. मुलगा चित्र काढतो.
  2. मुले चित्र काढतात.
ब) अकर्मक कर्तरी प्रयोग –
  • कर्तरी प्रयोगात कर्म नसेल तर तो अकर्मक कर्तरी प्रयोग
उदा :
  1. राणी हसते.
  2. पार्वती झोपते. (कर्म नाही)

२. कर्मणी प्रयोग : 

  • कर्माचे जे लिंग, वचन तेच लिंग, वचन क्रियापदाचे असते. अशा रचनेस कर्मणी प्रयोग म्हणतात. कर्म प्रथमात असते. कर्माप्रमाणे क्रियापद चालते. कर्त्याची विभक्ती तृतीया असते.
उदा :
  • अ) सतीशने पेरू खाल्ला.
  • ब) संगीताने सफरचंद खाल्ले.
  • क) अजयने काकडी खाल्ली.
( कर्माच्या लिंगबदलानुसार क्रियापद बदलते ).
उदा :
  1. सतीशने पेरू खाल्ला.
  2. संगीताने (तृतीया विभक्ती) सफरचंद (प्रथमा) खाल्ले. (लिंगबदल)

कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.

  1. प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग
  2. नवीन कर्मणी प्रयोग
  3. समापन कर्मणी प्रयोग
  4. शक्य कर्मणी प्रयोग
  5. प्रधान कर्ता कर्मणी प्रयोग
1. प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग :
  • मराठी भाषेमध्ये आलेला हा प्रयोग मूळ संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झाला आहे तसेच या कर्मणी प्रयोगाच्या उदाहरणांमध्ये येणारी वाक्य हि संस्कृत मधील कवीरूपी आढळतात.
उदा :
  1. नळे इंद्रास असे बोलीले.
  2. जो – जो किजो परमार्थ लाहो.
2. नवीन कर्मणी प्रयोग :
  • नवीन कर्मणी प्रयोगामध्ये इंग्रजी भाषेमधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून त्याला प्रत्यय लागत असतात.
उदा :
  1. रावण रामाकडून मारला गेला.
  2. चोर पोलिसांकडून पकडला गेला.
3. समापण कर्मणी प्रयोग :
  • मराठी भाषेमध्ये जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापण कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा :
  1. त्याचा पेरू खाऊन झाला.
  2. रामाची गोष्ट सांगून झाली.
4. शक्य कर्मणी प्रयोग :
  • भाषेमध्ये कर्मणी प्रयोगातील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा होतो किंवा दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे संबोधले जाते.
उदा :
  1. आई कडून काम करविते.
  2. बाबांकडून जिना चढविता.
5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग :
  • जेंव्हा एखाद्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्ता हा प्रथम मानला जातो तेव्हा निर्माण होणाऱ्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा :
  1. त्याने काम केले.
  2. तिने पत्र लिहिले.

3. भावे प्रयोग : 

  • मराठी भाषेमध्ये जेव्हा वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हटले जाते.
उदा :
  1. रामने बैलाला पकडले.
  2. सिताने मुलांना मारले.

भावे प्रयोगाचे तीन उपप्रकर पडतात.

  1. सकर्मक भावे प्रयोग
  2. अकर्मक भावे प्रयोग
  3. अक्तुक भावे प्रयोग
अ) अकर्मक भावे प्रयोग :
  • ज्या भावे प्रयोगात कर्म नसते. तो अकर्मक भावे प्रयोग. त्याने उठावे. कर्ता तृतीयेत आहे.
उदा :
  1. शेतावर जाण्यास त्याला उजाडले. त्यालाहा कर्ता चतुर्थीत आहे.
ब) सकर्मक भावे :
  • ज्या भावे प्रयोगात कर्म असते, त्यास सकर्मक भावेप्रयोग असे म्हणतात.
उदा :
  1. शिपायाने चोरास पकडले.
  2. शिपायांनी चोरांना पकडले.
  • क्रियापद पकडलेस्वतंत्र. कर्म-चोरास, चोरांना (द्वितीयेत).
3. अकर्तुक भावे प्रयोग :
  • भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तक भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा :
  1. आता उजाडले.
  2. शांत बसावे.
  3. आज सारखे उकडते.

भाषेचे प्रयोग व प्रकार :  रूपांतरण करणे –

1. कर्तरी प्रयोगाचे कर्मणी प्रयोगात रूपांतर
  • कर्तरी  –  कर्मणी
  1. गाय गवत खाते. – गाईने गवत खाल्ले.
  2. सलोख अभ्यास करतो. – सलोखने अभ्यास केला.
2. कर्मणी प्रयोगाचे कर्तरी प्रयोगात रूपांतर
  • कर्मणी  –  कर्तरी
  1. शितलने कविता लिहिली. – शितल कविता लिहिते.
  2. संदीपने चित्र काढले. – संदीप चित्र काढतो.
 नक्की वाचा : भाषेचे अलंकार

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here