विरामचिन्हे व त्याचे प्रकार | Punctuation in Marathi

viramchinhe
viramchinhe

विरामचिन्हे व त्याचे प्रकार | Viramchinhe

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मराठी भाषेतील विरामचिन्हे व त्याचे प्रकार यांचा अभ्यास करण्यापूर्वी विरामचिन्हे म्हणजे नेमके काय ? ते समजून हे समजून घेणे महत्वाचे आहे. विरामचिन्हे हा शब्द विराम + चिन्ह = विरामचिन्हे असा तयार झाला आहे. यामध्ये शब्दामधील विराम म्हणजे  ‘थांबणेव चिन्हे म्हणजे खुणाअसा त्याचा अर्थ होतो.

भाषेमधील एखादा उतारा वाचत असताना विरामचिन्हांचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक असते. एखादे वाक्य वाचत असताना काहीवेळा आपण थांबतो म्हणजेच विराम घेतो. हा विराम किती वेळ घ्यायचा हे विरामचिन्हांमुळे लक्षात येये. लेखनात विरामचिन्हे नसली तर वाक्य कोठे संपले व  कोठे सुरु झाले, ते कसे उच्चारायचे हे समजणार नाही. म्हणून विरामचिन्हांचा योग्य वापर केव्हा व कोठे करावा याची माहिती आपल्याला असायलाच हवी. आपण बोलताना एकसारखे बोलत नाही, वाचतानाही सारखे वाचीत नाही, बोलताना किंवा वाचताना थोडे थांबतो, काही ठिकाणी अर्धवट थांबतो व काही ठिकाणी पूर्ण थांबतो. थांबणे यालाच विसावा किंवा विराम म्हणतात.

विरामचिन्हे व त्याचे प्रकार :

  1. पूर्ण विराम [ . ]   
  2. अर्धविराम [ ; ]
  3. स्वल्पविराम [ , ]
  4. अपूर्ण विराम [ : ] 
  5. प्रश्नचिन्ह [ ? ]
  6. उद्गारचिन्ह [ ! ]
  7. अवतरण चिन्हे [ ‘ ‘ ] [ ” ” ]
  8. संयोग चिन्ह [ – ]
  9. अपसारण चिन्ह [ – ]
  10. लोप चिन्ह [ … ] 
  11. दंड [ | ] 

१) पूर्ण विराम [ . ]

भाषेमध्ये जेथे एखादा विचार पूर्ण प्रकट झालेला दिसतो व बोलताना तसे दर्शविण्यासाठी आपण तेथे पूर्ण थांबतो. थांबण्याची खूण म्हणून (.) असे चिन्ह वापरले जाते त्याला पूर्ण विराम म्हणतात.

  • अ) एखादे वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम वापरतात.
उदा :
  1. पक्षी झाडावर बसला .
  2. मला आई आवडते.
  3. तो घरी गेला.
  4. संगीताने फूले आणली .
  • ब) एखाद्या नावामधील आद्याक्षरे किंवा संक्षिप्त रुपाच्या शेवटी पूर्णविराम वापरले जातात.
उदा :
  1. वि.द.सावरकर (विनायक दामोदर सावरकर)

२) अर्धविराम ( ; )

विरामचिन्हे व त्याचे प्रकार यांचा अभ्यास करतना जेंव्हा भाषेचे लेखन करताना आपण वाक्यात ज्या ठिकाणी अधिक वेळ थांबावे लागते, परंतु बोलणे मात्र पूर्ण होत नाही. त्यासाठी ( ; ) हे अर्धविराम चिन्ह वापरतात. दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना अर्धविराम वापरतात.
उदा :
  1. त्याने खूप प्रयत्न केला ; परंतु शर्यत हरला.
  2. ढग खूप गर्जत होते; पण पाऊस मात्र आला नाही.
  3. हे काम अवघड होते; पण गोविंदा कल्पक होता.

 ३) स्वल्पविराम ( , )

वाक्यात जेथे थोडेसे थांबावे लागते, तेथे ( ,) हे स्वल्पविराम चिन्ह देतात. नामे, सर्वनामे, विरोषणे, क्रियापदे इ समान जातीचे अनेक शब्द एकत्र आले तर अशा प्रत्येक शब्दापुढे स्वल्पविराम वापरले जाते. एकाच जातीचे शब्द किंवा छोटी वाक्ये लागोपाठ आल्यास तसेच संबोधन दाखवताना स्वल्पविराम यांचा वापर होतो.
उदा :
  1. राजूने बाजारातून केळी, द्राक्षे, अंजीर, कलिंगड ही फळे आणली.
  2. अनिलला मराठी , गणित, विज्ञान हे विषय आवडतात.
  3. शिकारी पुन्हा गेला , जाळे पसरवले आणि बाजूला जाऊन बसला.
  4. महाराज , मला माफ करा.

४) अपूर्ण विराम [ : ]

वाक्य लिहताना जेव्हा वाक्याच्या शेवटी एखादा तपशील दयावयाचा असतो तेव्हा त्या तपशीलाच्या आधी (:) हे अपूर्ण विराम चिन्ह वापरतात.
उदा :
  1. मुख्य ऋतू तीन आहेत : उन्हाळा, पावसाळा, हिवाळा.
  2. पुढील पर्याय क्रमांक चौकटीत लिहा : 4, 6, 8, 10.

५) प्रश्न चिन्ह ( ? ) 

वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी (?) हे चिन्ह वापरतात. त्याला प्रश्नचिन्ह असे म्हणतात.
उदा :
  1. तुमच्या हातात काय आहे ?
  2. तुझे नाव काय आहे ?

६) उद्गारवाचक चिन्ह ( ! ) 

जेंव्हा एखाद्या वाक्यामध्ये मनातील हर्ष, आश्चर्य, दुःख इ. पैकी कोणती ही भावना व्यक्त करायची असते तेंव्हा अशा भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या शेवटी (!) हे उदगार चिन्ह देतात. तसेच केवलप्रयोगी शब्दही आपल्या मनातील विकार दाखविण्यासाठीच वाक्यात वापरले जातात. म्हणून केवलप्रयोगी शब्दापुढे व त्या वाक्यापुढे उद्गार चिन्ह वापरले जाते.
उदा :
  1. अरे बापरे ! केवढा मोठा साप हा !
  2. ओहोहो ! किती मोठी जखम आहे हि !

७) अवतरण चिन्ह ( ” ) ( ‘ ) 

महत्वाचे शब्द किंवा शब्द समूह किंवा दुसऱ्यांचे म्हणणे (‘ ‘) ह्या किंवा (” “) ह्या चिन्हाने दर्शवीत जातात या चिन्हांना अवतरण चिन्ह असे म्हणतात.
  • अ) एकेरी अवतरण चिन्ह ( ” )
जेंव्हा एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास एकेरी अवतरण चिन्ह वापरतात.
उदा :
  1. ययाति हे पुस्तक वि.स.खांडेकर यांनी लिहले आहे.
  2. दौलताबादचे जुने नाव देवगिरीअसे होते.
  • ब) दुहेरी अवतरण चिन्ह ( ” ” )
व्याकरणामध्ये एखाद्या वाक्यामध्ये बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी वापरतात दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो.त्यामुळे आपल्याला बोलणार्याचे शब्द अधोरेखित करता येतात.
उदा :
  1. बिरबल म्हणाला, ” तुमचे नाव काय आहे ? “

८) संयोग चिन्ह ( – )

मराठी व्याकरणामध्ये सामासिक शब्दातील प्रत्येक दोन पदामध्ये ( – ) ही खूण असते, तिला संयोगचिन्ह असे म्हणतात.दोन शब्दांमधील परस्पर संबंध दर्शवण्यासाठी संयोग चिन्हाचा वापर व्याकरणामध्ये केला जातो.
  • अ) दोन शब्द जोडताना वापरतात.
  1. हरि-हर, राम-कृष्ण, गंगा-यमुना, विद्यार्थी-भांडार
  • ब) ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास
  1. शिवाजी महाराजांचा जन्म शिव – नेरी किल्ल्यावर झाला.

९) अपसारण चिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह ( – ) 

मराठी व्याकरणामध्ये वाक्यामध्ये एखाद्या गोष्टीचा किंवा बाबींचा खुलासा किंवा स्पष्टीकरण करावयाच्या वेळी (-) या चिन्हाचा उपयोग करतात, त्यास अपसारणचिन्ह असे म्हणतात.
उदा :
  1. मीनल आज एक चित्र काढणार होती. पण ……?

 १०) लोप चिन्ह ( … ) 

जेंव्हा एखादे वाक्य बोलता-बोलता मधेच विचार खंडित आपण बोलताना थोडे थांबतो तेंव्हा लोप चिन्ह वापरले जाते.
उदा :
  1. मला हे पहायचं होतं, पण…
  2. आई…मला…शंभर रुपये…

११) दंड ( एकेरी दंड | ), ( दुहेरी दंड || )

मराठी व्याकरणामध्ये ओवी, अभंग श्लोक यांचा शेवट दाखवण्यासाठी दंड वापरले जाते.
उदा :
  1. देह देवाचे मंदिर | आत आत्मा परमेश्वर ।।
  2. जे का रंजले गांजले । त्यांसि म्हणे जो आपुले ||

विरामचिन्हे व त्याचे प्रकार महत्वाची माहिती :

  • तारीख – महिना – वर्ष दाखविण्यासाठी विग्रह चिन्ह वापरतात. उदा : दिनांक ७-५-२०२० रोजी.
  • शब्दाच्या संक्षिप्त रूपासमोर (०) हे चिन्ह वापरतात. उदा : डाॅक्टरसाठी डाॅ०, प्राध्यापक साठी प्रा०
  • जुन्या काळी संक्षिप्त रूप लिहून दाखविण्यासाठी जास्तीचा काना वापरीत असत. उदा : ‘रावसाहेब’साठी रावसोा. अजूनही कॊल्हापूरसारख्या काही जिल्ह्यांत रावसाहेबसाठी रावसोा, अप्पासाहेबसाठी अप्पासोा, तात्यासाहेबसाठी तात्यासोा असेच लिहितात.
  • मराठी व्याकरणामध्ये काही ठिकाणी ‘किंवा’ या शब्दाऐवजी (/) वापरतात. उदा : प्रगती पुस्तकावर वडील/पालक यांची सही आणावी.
  • विराम चिन्हांखेरीज छापलेल्या मजकुरात काही ‘छपाई’ चिन्हे आढळतात; उदा : 
  • ‘एकेरी खंजीर’ नावाचे चिन्ह (†) मजकुरातल्या एखाद्या शब्दाचे किंवा वाक्याचे स्पष्टीकरण जेव्हा पानाच्या तळाशी देतात, तेव्हा त्या शब्दालागून वापरतात. याच कारणासाठी दुहेरी खंजीर (‡), तारा (*), (¶ – पिलक्रो=परिच्छेद चिन्ह) यांचाही उपयोग करतात.
  • वगैरे, वगैरे

सारांश | Conclusion :

मराठी व्याकरणामध्ये आणि रोजच्या जीवनामध्ये नेहमी वापरले जाणारे त्याचबरोबर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे विरामचिन्हे व त्याचे प्रकार आपण आज या लेखामध्ये अभ्यासले आहेत. विरामचिन्हांचा वापर केल्याशिवाय तुमचे वाक्य शुद्धलेखनाच्या दृष्टीकोनातून पूर्ण होऊच शकत नाही त्यामुळे सर्व विरामचिन्हे व त्याचे प्रकार यांचा अभ्यास हा अनिवार्य ठरतो.

– नक्की वाचा –

मराठी जोडशब्द व अर्थअलंकार व त्याचे प्रकार
भाषेचे प्रयोग व प्रकारमराठी म्हणी व वाक्प्रचार

17 COMMENTS

  1. नमस्कार सर/मॅडम,
    आपण या लेखात Viram Chinh in Marathi बद्दल दिलेली माहिती आम्हाला खूप उपयुक्त आहे. आपण खूपच सोप्या भाषेत या बद्दल माहिती दिली आहे.
    आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

  2. आपण अतिशय सुंदर अशी माहिती दिली आहे. ही माहिती आम्हाला मुलांचा अभ्यास घेताना उपयोगी पडते. माझ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना संकल्पना स्पष्ट होण्यासाठी कायम तुमच्या website बद्दल माहिती देत असतो.आपण नवनवीन माहिती उपलब्ध करून द्यावी ही अपेक्षा.धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here