समास व त्याचे प्रकार : मराठी व्याकरण

samas v tyache prakar
samas v tyache prakar

मराठी व्याकरणातील समास व त्याचे प्रकार

मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी समास व त्याचे प्रकार या घटकाचा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. या घटकावर हमखास दोन-तीन प्रश्न सर्व परीक्षांमध्ये विचारल्या जातात, यामध्ये समास व त्याचे प्रकार यांचा समावेश होतो. परीक्षेसाठी आवश्यक अशा समास व त्याचे प्रकार या विषयावरील विविध उदाहरणे खाली दिलेली आहेत.

समास म्हणजे काय ?

  • व्याकरणामध्ये दोन किंवा दोनांपेक्षा अधिक शब्दामधील विभक्ती प्रत्यय अथवा संबंध दर्शक शब्द गाळून त्यापासून जो एक संयुक्त शब्द बनविला जातो त्या पदधतीस समास‘ म्हणतातअशा रीतीने तयार झालेल्या संयुक्त (जोडशब्द) शब्दाला मराठी व्याकरणात सामासिकशब्द म्हणतात.
उदा :
  1. राजाचा वाडा – राजवाडा हा सामासिक शब्द,

समास व त्याचे प्रकार

मराठी व्याकरणात समासाचे एकूण चार प्रकार आहेत

  1. अव्ययीभाव समास
  2. तत्पुरुष समास
  3. द्वंद्व समास
  4. बहुव्रीहि समास

1. अव्ययीभाव समास :

मराठी व्याकरणानुसार ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास अव्ययीभाव समासअसे म्हणतात. मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत.
उदाहरण :
  1. गावोगावी – प्रत्येक गावात
  2. गल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत
  3. दारोदारी – प्रत्येक दारी
  4. घरोघरी – प्रत्येक घरी
  5. घडोघडी – प्रत्येक घडीला
  6. प्रतिक्षण – प्रत्येक क्षणी
  7. यथायुक्त – युक्त असे
  8. दरसाल – प्रत्येक साली
  9. हरघडी – प्रत्येक घडीला
  10. रस्तोरस्ती – प्रत्येक रस्ती
  11. आळोआळी – प्रत्येक आळीत
  12. यथाशास्त्र – शास्त्राप्रमाणे
  13. यथायोग्य – योग्य असे
  14. दिवसेंदिवस – प्रत्येक दिवशी
  15. क्षणोक्षणी – प्रत्येक क्षणाला
  16. जागोजाग – प्रत्येक जागी
  17. अनुरूप – रूपास योग्य
  18. गैरहजर – हजर नसलेला
  19. नापसंत  पसंत नसलेला
  20. गैरवाजवी – वाजवी नसलेला
  21. बारमास – वारामहिने पर्यंत
  22. बिनतोड – तोड नसलेला
  23. विनाकारण – करणाशिवाय
  24. बेकायदा – कायद्या विरूद्ध
  25. विनतक्रार – तक्रार न करता
  26. यावज्जीव – जीव असेपर्यंत
  27. गैरशिस्त – शिस्त नसलेला
  28. बेसुमार – सुमार नसलेले
  29. आसेतु हिमाचल – सेतूपासून हिमाचल पर्यंत

2. तत्पुरुष समास :

  • ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेल्या शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
  • ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
उदाहरण :
  1. महामानव – महान असलेला मानव
  2. राजपुत्र – राजाचा पुत्र
  3. तोंडपाठ – तोंडाने पाठ
  4. गायरान – गाईसाठी रान
  5. वनभोजन – वनातील भोजन
  • तत्पुरुष समासाचे प्रकार

अ ) विभक्ती तत्पुरुष समास

आ ) उपपद तत्पुरुष समास

इ ) कर्मधारय समास

ई ) द्विगू समास

उ ) मध्यमपद लोपी समास

अ) विभक्ती तत्पुरुष समास :

मराठी व्याकरणानुसार ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात.
  • विभक्ती तत्पुरुष समासाची काही उदाहरणे :

सामासिक शब्द

विग्रह समास

दुःख प्राप्त

 दुःखाला प्राप्त  द्वितीया तत्पुरुष समास
तोंडपाठ    तोंडाने पाठ

   तृतीया तत्पुरुष समास

सुख प्राप्त  सुखाला प्राप्त

  द्वितीया तत्पुरुष समास

विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणे :
१) द्वितीया तत्पुरुष समास –

सामासिक शब्द

विग्रह

समास

सुख प्राप्त

  सुखाला प्राप्त   द्वितीया तत्पुरुष समास
दुःखप्राप्त   दुःखाला प्राप्त

  द्वितीया तत्पुरुष समास

२) तृतीया तत्पुरुष समास –
  1. परस्परनिगडित = परस्पराशी निगडित
  2. ईश्वर निर्मित = ईश्वराने निर्मित
  3. मतिमंद = मतीने मंद
  4. हस्तलिखित = हाताने लिहिलेले
  5. मातृसदृश = मातेशी सदृश
३) चतुर्थी तत्पुरुष समास –
  1. ग्रंथालय – ग्रंथासाठी आलय
  2. पोळपाट – पोळीसाठी पाट
  3. क्रीडांगण – क्रीडेसाठी अंगण
  4. गायरान – गायीसाठी असलेले रान
  5. विद्यागृह – विद्येसाठी गृह
  6. ब्राह्मणभोजन – ब्राह्मणासाठी भोजन
  7. क्रीडाभवन – क्रिडेसाठी भुवन
  8. व्यवहारोपयोगी – व्यवहारासाठी उपयोगी
  • नक्की वाचा : समानार्थी शब्द
४) पंचमी तत्पुरुष समास –
  1. चोरभय – चोरापासून भय
  2. ऋणमुक्त – ऋणापासून मुक्त
  3. रोगमुक्त – रोगापासून मुक्त
  4. संकटमुक्त – संकटापासून मुक्त
  5. धर्मभ्रष्ट – धर्मातून भ्रष्ट
  6. मनुज – मनुपासून जन्मलेला
  7. जातिभ्रष्ट – जातीतून भ्रष्ट
५) षष्टी तत्पुरुष समास –
  1. धर्मवेड – धर्माचे वेड
  2. राष्ट्रध्वज – राष्ट्राचा ध्वज
  3. समुद्रकाठ – समुद्राचा काठ
  4. देवभक्ती – देवाची भक्ती
  5. पिंपळपान – पिंपळाचे पान
  6. जनसेवा – जनांची सेवा
  7. हिमाद्री – हिमाचा अद्री
  8. विद्याभ्यास – विद्या अभ्यास
  9. घोडदौड – घोड्याची दौड
  10. पुष्पमाला – पुष्पांची माला
  11. बालमित्र – बालपणाचा मित्र
  12. देशाभिमान – देशाचा अभिमान
  13. देवपूजा – देवाची पुजा
  14. राममंदिर – रामाचे मंदिर
६) सप्तमी तत्पुरुष समास –
  1. शास्त्रपंडित – शास्त्रातपंडित
  2. कलाकुशल – कलेत कुशल
  3. घरकोंबडा – घरात राहणारा
  4. स्वर्गवास – स्वर्गात असे वास

आ) उपपद तत्पुरुष समास –

जेव्हा तपुरुष समासातील दुसरे पद कि ज्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होत नाही, अशा प्रकारचे – कृदंत – म्हणजे धातुसाधित असते. तेव्हा त्यास उपपद तत्पुरुष समास म्हणतात.
 
  1. सर्वज्ञ – सर्व जाणणारा
  2. जलद – जल देणारा
  3. गृहस्थ – गृहात राहणारा
  4. शास्त्रज्ञ – शास्त्र जाणणारा
  5. शेषशायी – शेषावर निजणारा
  6. शेतकरी – शेती करणारा
  7. कामकरी – काम करणारा
इ) कर्मधारय समास – 
दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात , दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही पदे विशेषण असतात , उपमान किंवा रूपक म्हणून वापरतात. कर्मधाराय समासाचे दोन पोट प्रकार आहेत.
  1. दविगू समास
  2. मध्यमपद लोपी समास
उदा : 
  1. विद्याधन – विद्या हेच धन
  2. चरणकमल – चरण रूपी कमल
  3. मुख्याध्यापक – मुख्य असा अध्यापक
  4. अन्नब्रह्म – अन्नरूपी ब्रह्म
  5. कृष्णकमल – कृष्ण असे कमल
  6. कुरूप – कु असे रूप
  7. महात्मा – महान असा आत्मा
  8. गोधन – गो ( गाय ) हेच धन
  9. महादेव – महा ( महान ) असा देव
१) द्विगु समास –
मराठी व्याकरणामध्ये ज्या कर्मधारय समासात पहिले पद संख्यावाचक विशेषण असून त्या शब्दाच्या योगाने ( सहाय्याने ) समुदायाचा अर्थ उत्पन्न होतो. जेंव्हा सर्व शब्द एकवचनीच असतात. त्यास द्विगु समास म्हणतात.
उदा :
  1. पंचारती  – पाच आरत्यांचा समूह
  2. त्रिभुवन – तीन भुवनांचा समूह
  3. नवग्रह – नऊ ग्रहांचा समुदाय
  4. त्रैलोक्य – तीन लोकांचा समूह
  5. नवरात्र  नऊ रात्रीचा समूह
  6. पंचपाळे – पाच पाळ्यांचा समुदाय
  7. चातुर्मास  चार महिन्यांचा समूह
  8. सप्ताह – सात आहांचा (दिवसांचा) समूह
२) मध्यमपद लोपी समास – 
ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारा एक शब्द असे अनेकशब्द लुप्त असतात व विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते. त्यास मध्यमपद लोपी समास असे म्हणतात.
उदा :
  1. साखरभात – साखरेने युक्त भात
  2. पुरणपोळी – पुरण भरून केलेली पोळी
  3. वांगीपोहे – वांगी घालून केलेले पोहे
  4. बटाटेभात – बटाटे घालून केलेला भात
  5. भाचेजावई – भाचीचा नवरा म्हणून जावई
  6. मामेभाऊ – मामाचा मुलगा म्हणून मामेभाऊ
3 ) नत्र, तत्पुरुष समास –
अभाव ( कमतरता ) किंवा निषेध ( नकार ) या अथीं व्यंजनादि ( व्यंजनांच्या अगोदर ) शब्दांचे पूर्वी आणि स्वरादी शब्दांचे पूर्वीही अव्यये येऊन जे तत्पुरुष समास तयार होतात, त्यास नत्र तत्पुरुष समास म्हणतात, ज्या तत्पुरुष समाजातील पहिले पद हे अ,अन,न ,ना,बे,नि,गैरयांसारख्या अभाव किंवा निषेध दर्शक उपसर्ग ने सरू होते त्यास नत्र तत्पुरुष समास म्हणतात.
उदाहरण : 
  1. नापसंत – पसंत नसलेला
  2. बेकायदा – कायदेशीर नसलेले
  3. अहिंसा – हिंसा नसलेला
  4. अनादर – आदर नसलेला
  5. अन्याय – न्याय नसलेला
  6. निरोगी – रोग नसलेला
  7. बेसावध – सावध नसलेला

समास व त्याचे प्रकार

3) द्वंद्व समास :

ज्या समासामध्ये दोन्ही पदे हि महत्वाची असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात . क्रियापद प्रधान – उभयपदे महत्त्वाची – ज्या समासतील दोन्ही पदे प्रधान असतात त्यास द्वंद्व असे म्हणतात. यात समासाचा विग्रह करताना दोन पदांचा संबंध आणि, ,अथवा, किंवाअशा उभयान्वयी अव्ययानी स्पष्ट करावा लागतो.
उदाहरण : 
  1. मातापिता  – माता आणि पिता
  2. पापपुण्य  पाप अथवा पुण्य
  3. कृष्णार्जुन  कृष्ण व अर्जुन
  4. न्यायान्याय  – न्याय किंवा अन्यास
  • द्वंद्व समासाचे तीन प्रकार आहेत 
अ) इतरेतर द्वंद्व
ब) वैकल्पिक द्वंद्व
क) समाहार द्वंद्व
अ) इतरेतर द्वंद्व –
  • इतरेतर द्वंद्व समासातील दोन पदांमध्ये “आणि, , ‘ समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यये विग्रहाच्या वेळी घालावी लागतात.
उदाहरण : 
  1. नवराबायको  – नवरा व बायको
  2. यक्षकिन्नर – यक्ष आणि किन्नर
  3. सेवाशुश्रुषा  सेवा आणि शुश्रुषा
  4. कौरवपांडव – कौरव आणि पांडव
  5. उघडाबोडका  उघडा आणि बोडका
  6. खाचखळगे – खाच आणि खळगे
  7. रामलक्ष्मण – राम आणि लक्ष्मण
  8. वृक्षलता – वृक्ष आणि लता
  9. कृष्णार्जुन – कृष्ण आणि अर्जुन
  10. राधाकृष्ण – राधा आणि कृष्ण
  11. स्त्रीपुरुष – स्त्री आणि पुरुष
  12. दहीभात – दही आणि भात
  13. स्पृश्यास्पृश्य – स्पृश्य आणि अस्पृश्य
  14. पळीपंचपात्रे – पळी आणि पंचपात्रे
  15. लेकीसुना – लेकी आणि सुना
  16. हातपाय – हात आणि पाय
  17. प्रश्नोत्तर – प्रश्न आणि उत्तर
ब) वैकल्पिक द्वंद्व –
  • ह्या समासातील पदामध्ये विग्रह करताना अथवा, किंवाह्यापैकी विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये घालावी लागतात. अर्थाच्या दृष्टीने समासातील दोन्ही प्रधान पदापैकी एकाचीच मात्र अपेक्षा असते.
उदाहरण :
 
  1. खरेखोटे – खरे किंवा खोटे
  2. जयपराजय  – जय किंवा पराजय
  3. पासनापास – पास किंवा नापास
  4. सारासार – सार किंवा असार
  5. मानापमान – मान किंवा अपमान
  6. बरेवाईट – बरे किंवा वाईट
  7. देवदानव – देव किंवा दानव
  8. न्यायान्याय – न्याय किंवा अन्याय
  9. नेआण – नेणे किंवा आणणे
  10. पापपुण्य – पाप किंवा पुण्य
  11. चारपाच – चार किंवा पाच
  12. इकडेतिकडे – इकडे किंवा तिकडे
क) समाहार द्वंद्व –
  • समाहार द्वंद्व समासामध्ये समासयुक्त पदांच्या अर्थाशिवाय आणखी तशाच प्रकारच्या अधिक गोष्टीचाही अंतर्भाव होतो.
उदाहरण :
  1. चहापाणी – चहा, पाणी व फराळाचे पदार्थ
  2. भाजीपाला – भाजी, पाला असेच पदार्थ
  3. मीठभाकर – मीठ,भाकर तसेच अन्य पदार्थ

४) बहुव्रीहि समास –

  • बहुव्रीही समासात समासातील पदापैकी कोणतेही पद प्रधान नसून त्या सर्व सामासिक पदापासून त्यात असणाऱ्या पदांच्या शिवाय निराळ्याच पदाचा प्रामुख्याने बोध होतो व तो सामासिक शब्द त्या निराळ्या पदाचे विशेषण असतो. त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.
उदाहरण :
 
  1. दशानन – दश आहेत आणणे ज्याला तो – रावण
  2. लंबोदर – लंब म्हणजे मोठे आहे उदर ज्याचे तो – गणपती

13 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here