Mahatma Jyotiba Fule | महात्मा ज्योतिबा फुले

Jyotiba fule
mahatma Jyotiba fule

भारताच्या इतिहासामध्ये महात्मा ज्योतिबा फुले | Mahatma Jyotiba Fule यांच्या महान कार्याला तोड नाही. आपले संपूर्ण जीवन महात्मा फुले यांनी दलित व अन्यायग्रस्त समाजासाठी खर्ची घातले. महात्मा फुले हे थोर लेखक, समाजसुधारक आणि कवी होते. महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांच्याच हातून रोवल्या गेली आहे. थोर समाजसुधारक म्हणून आपण त्यांना ओळखतो अशा या महान आणि असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या महापुरुषाविषयी माहिती आपण आज जाणून घेऊयात.

महात्मा फुले यांचा जन्म :

  • महात्मा ज्योतीबा फुले (Jyotiba Fule) यांचा जन्म १९ एप्रील १८२७ रोजी पुण्यामध्ये झाला. परंतु त्यांचे मुळगाव सातारा जिल्हयातील “कटगुण” हे होते. त्यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय शिक्षक हक्क दिन म्हणून साजरा केल्या जातो.
  • महात्मा फुलेंचे पुर्ण नाव :
  • महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतीबा गोविंदराव फुले हे होते. ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी जन्म झाल्यामुळे त्यांचे नाव ज्योतिबा ठेवण्यात आले. ज्योतीबांचे मुळ आडनाव “गोऱ्हे” असे होते परंतु ज्योतीबांच्या आजोबांचा फुलांचा व्यवसाय होता . ते पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे काम करत असत. पेशव्यांनी खुश होऊन त्यांना 35 एकर जमीन दिली होती. त्यामुळे कालांतराने त्यांचे फुल व्यवसायाहुन आडनाव फुले असे झाले. महात्मा फुलेंच्या आईचे नाव “चिमणाबाई” होते तर आजोबांचे नाव “शेरीबा” असे होते. एक वर्षाचे असताना ज्योतीबा फुले यांच्या आईचा मृत्यु झाला त्यानंतर ज्योतीबांचा सांभाळ आणि पालनपोषण त्यांची आत्या “सगुनाबाई” यांनी केले.
  • ज्योतिबा फुलेंचा विवाह :
  • १८४० मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचा विवाह सातारा जिल्हयातील धनकवडीच्या खंडोजी सिंधुजी नेवसे (झगडे पाटील) यांची कन्या “सावित्रीबाई” (वय 8 वर्षे) यांच्याशी झाला.
  • सावित्रीबाई फुले यांचा जन्म ०३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्हयातील “नायगाव” येथे झाला. महाराष्ट्र राज्यामध्ये ०३ जानेवारी हा दिवस “राज्य स्त्री मुक्ती दिन” म्हणुन साजरा केला जातो.
  • महाराष्ट्र सरकारने सावीत्रीबाई फुले यांचे नायगाव जि. सातारा येथील घर “राष्ट्रीय स्मारक” म्हणून घोषीत केलेले आहे.

ज्योतिबा फुलेंचे शिक्षण :

  • १८३४ ते १८३८ मध्ये ज्योतीबांनी (Jyotiba Fule) प्राथमिक शिक्षण पंतोजींच्या मराठी शाळेत घेतले. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी काहीकाळ भाजी विक्रीचा व्यवसाय केला.
  • ज्योतीबांचे बौद्धीक कौशल्य पाहुन त्यांच्या शेजारी राहणारे उर्दू शिक्षक गफार बेग मुन्सी व धर्मोपदेशक लिजीट साहेब या दोघांच्या प्रयत्नाने ज्योतीबाना खाजगी स्कॉटीश मिशनीरीच्या शाळेत प्रवेश घेता आला. संस्कृत, व्याकरण, ज्योतीष, विज्ञान, धर्मशास्त्र इ. विषयांचा चांगला अभ्यास ज्योतीबांनी या शाळेमध्ये केला.
  • फुले सुरुवातीपासूनच बंडखोर वृत्तीचे होते आणि त्यांना राजकीय व सामाजिक गुलामगिरी सहन करण्याबद्दल फार चिड होती. भारत देशातील इंग्रजांचे राज्य उलथवून टाकण्याच्या हेतूने १८४७ मध्ये ज्योतीबांनी लहुजी उस्ताद मांग-साळवे या पैहलवानाकडुन नेमबाजी व दांडपट्टयाचे प्रशिक्षण घेतले होते.
  • तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज व मार्टिन ल्युथर किंग यांच्या पासुन अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांना मिळाली होती.
  • थॉमस पेन” यांच्या “राईट्स ऑफ मॅन” या पुस्तकाचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.

ज्योतिबा फुलेंचे शैक्षणिक कार्य :

  • अहमदनगरच्या स्कॉटीश शाळेच्या शिक्षीका “मिस फरार” यांच्या कडुन प्रेरणा घेऊन ०३ ऑगस्ट १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठ मधील भिड्यांच्या वाड्यात ज्योतीबांनी (Jyotiba Fule) देशातील पहीली मुलींची शाळा सुरु केली. देशामध्ये स्वतंत्रपणे मुलींची शाळा सुरु करणारे ज्योतीबा हे पहीले समाजसुधारक होते.
  • ०३ जुलै १८५१ रोजी महात्मा फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठ मध्ये आण्णासाहेब चिपळुणकर यांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरु केली.
  • १७ सप्टेंबर १८५१ रोजी पुण्यातील रास्ता पेठ येथे मुलींची तिसरी शाळा ज्योतीबांनी सुरु केली.
  • १५ मार्च १८५२ रोजी वेताळ पेठ मध्ये मुलींची चौथी शाळा ज्योतीबांनी सुरु केली.
  • १९ मे १८५२ रोजी पुण्यातील “वेताळ पेठ” येथे ज्योतीबांनी अस्पृश्य मुलांच्या शिक्षणासाठी पहीली शाळा सुरु केली.
  • १७ सप्टेंबर १८५२ रोजी ज्योतीबा फुले यांनी पुण्यात स्वतंत्र ग्रंथालयाची स्थापना केली.
  • पुणे महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य थॉमस कॅन्डी यांनी ब्रिटीश सरकारचे वतीने दि १६ नोव्हेंबर १८५२ रोजी पुण्यातील विश्रामबाग वाड्यात ज्योतीबांचा विशेष सत्कार केला.
  • लोकांना शिकविण्याकरीता शिक्षक उपलब्ध व्हावेत या उद्देशाने १० सप्टेंबर १८५३ रोजी “महार, मांग, चांबार इ. लोकांस विद्या शिकविणारी मंडळी” या नावाची संस्था ज्योतीबांनी सुरु केली.
  • ब्रिटीश सरकारने महात्मा फुलेंची (Jyotiba Fule) स्त्री शिक्षणासाठी असलेली तळमळ पाहून त्यांना “दक्षिणा प्राईज फंड” च्या साह्याने दरमहा २५ रु प्रमाणे मदत केली.
  • १८५४ च्या काळामध्ये ज्योतीबांनी स्कॉटीश मिशनरी शाळेमध्ये अर्धवेळ शिक्षकाची नोकरी केली होती.
  • १८५५ साली भारतातील पहीली “पौढांसाठीची रात्र शाळा” ज्योतीबांनी पुण्यात सुरु केली होती.

महात्मा फुलेंचे सामाजिक कार्य ( Jyotiba Fule) :

  • ०८ मार्च १८६० रोजी पुण्यात ज्योतीबांनी पहीला विधवा पुर्नविवाह घडवुन आणला होता.
  • १८६३ मध्ये ज्योतीबा फुलेंनी (Jyotiba Fule) स्वतःच्या घरीच भारतातील पहीले “बालहत्या प्रतिबंधक गृह” स्थापन केले व नंतर पंढरपुर येथेही ज्योतीबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले.
  • निपुत्रीक असताना देखील दुसरे लग्न न करता फुलेंनी बाल हत्या प्रतिबंधक गृहातील काशीबाई ब्राम्हण विधवेच्या “यशवंत” या मुलाला दत्तक घेतले.
  • १८६४ मध्ये पुण्यातील गोखल्यांच्या बागेत “शेरवी” जातीतला “पहीला विधवा पुर्नविवाह‘ ज्योतीबांनी घडवुन आणला.
  • १८६५ मध्ये देशातील विधवांच्या केस रोपनाच्या प्रथेला विरोध करण्याकरीता ज्योतीबांनी पुण्यातील “तळेगाव ढमठेरे” आणि “ओतुर” येथे “न्हावीकांचा संप” घडवुन आणला.
  • १८६७ मध्ये रायगड येथील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धार करण्याचे महत्वपुर्ण काम ज्योतीबांनी केले.
  • ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक सुधारणा पाहून आपल्या धर्मामध्ये ते हस्तक्षेप करत आहेत असा सनातनी लोकांचा समज झाल्यामुळे सनातनी लोकांनी त्यांना मारण्याकरीता शेंडे व कुंभार या मारेकऱ्यांना पाठविले होते पंरतु तेच मारेकरी नंतर फुलेंचे अनुयायी बनले होते.
  • १८६८ मध्ये अस्पृश्यांसाठी महात्मा फुलेंनी त्यांचे घरातील पाण्याचा हौद वापरासाठी खूला करून दिला होता.
  • १८५५ मध्ये ज्योतीबांनी “तृतीय रत्न” हे नाटक लिहीले. ब्राम्हण लोक शुद्रांची कशी फसवणुक करतात हे त्यांनी सप्रमाण या नाटकातुन समाजाला दाखवुन दिले.
  • १८६९ मध्ये “छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा” ज्योतीबांनी रचला व त्यामध्ये ज्योतीबांनी स्वतःला “कुळवाडी भुषण” ही उपमा त्यांनी दिली.
  • १८६९ मध्ये “ब्राम्हणांचे कसब” हा काव्यत्मक ग्रंथ ज्योतीबांनी (Jyotiba Fule) लिहीला.
  • सत्यशोधक समाज :
  • २४ सप्टेंबर १८७३ रोजी ज्योतीबांनी पुणे येथे “सत्यशोधक समाज” या संस्थेची स्थापना केली. “| सर्व साक्ष जगत्पती | त्याला नकोची मध्यस्थी |” हे सत्यशोधक समाजाचे ब्रिद वाक्य होते. १८७३ मध्ये ज्योतीबांनी सत्यशोधक समाज मार्फत अस्पृशांच्या जाहीरनामा प्रसिद्ध केला. १८७३ मध्ये राधाबाई निंबाळकर व सिताराम अल्हाट यांचा सत्यशोधक समाज पद्धतीने विवाह घडवुन आणला.
  • सत्यशोधक समाज मार्फत “दिनबंधु” हे वृत्तपत्र ०१ जोनवारी १८७७ रोजी ज्योतीबांनी सुरु केले. या वृत्तपत्राचे संपादक कृष्णराव भालेकर हे होते. १८८० साली हे वृत्तपत्र नारायण लोखंडे यांच्याकडे देण्यात आले.
  • १८७३ मध्ये ज्योतीबांनी “गुलामगिरी” हा ग्रंथ लिहुन तो अमेरीकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या निग्रो वंशीयांना / काळ्या लोकांना तो अर्पण केला.
  • महाराष्ट्रामध्ये फुले यांनी ब्राम्हणेत्तर चळवळीचा पाया घातला.
  • १८७५ मध्ये पुण्यातील जुन्नर व अहमदनगर या भागात शेतकऱ्यांसाठी ज्योतीबांनी (Jyotiba Fule) “खत फोडीचे आंदोलन” केले. सदरचे आंदोलन ०२ वर्षे चालले.
  • ज्योतीबा फुले यांनी हरी शिंदे व कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने फुल्यांनी “कमर्शिल अँड कॉन्ट्रॅक्टिंग” ही बांधकाम कंपनी सुरु केला. पुण्यातील खडवासला धरण बांधण्यामध्ये या कंपनीचा मोलाचा वाटा होता.
  • १८७६ ब्राम्ह्ननांशिवाय लग्न लावता यावे म्हणून त्यांनी मराठीमध्ये मंगलाष्टके तयार केली.
  • १८७७ मध्ये देशात पडलेल्या दुष्काळादरम्यान पुण्यातील “धनकवडी” येथे ज्योतीबांनी विद्यार्थ्यांसाठी कैँप सुरु केला.
  • हंटर कमिशन पुढे साक्ष :
  • १८८२ साली भारतामध्ये शिक्षणासंबंधी आलेल्या हंटर कमिशन पुढे महात्मा फुले यांनी साक्ष दिली. भारतातील शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटीश शासनाने हे कमीशन नेमले होते. हंटर कमिशन समोरील साक्ष देतेवेळी १२ वर्षाखालील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीने द्यावे अशी मागणी ज्योतीबा फुले यांनी केली.
  • पंडीता रमाबाई व लेले शास्त्री यांनी धर्मातर करु नये म्हणुन ज्योतीबांनी प्रयत्न केले.
  • २५ सप्टेंबर १८८४ साली रोजी नारायण मेघाजी लोखंडे यांनी “मिल्स हॅन्ड असोसिएशन” ही भारतातील पहीली कामगार संघटना ज्योतीबांच्या मदतीने स्थापन केली.
  • ०२ मार्च १८८८ रोजी व्हिक्टोरिया राणीचे पुत्र “ड्युक ऑफ कॅनॉट” हा भारत भेटीवर आला होता. भारतीय शेतकऱ्यांची अवस्था ब्रिटीशांना समजावुन सांगण्याकरीता ज्योतींबानी पुण्यामध्ये शेतकऱ्याच्या वेशामध्ये त्यांचे स्वागत केले.
  • ११ मे १८८८ रोजी मुबई येथील “कोळीवाडा (मांडवी) ” या समारंभामध्ये मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादर बडेकर यांनी फुले यांना “महात्मा” ही पदवी दिली.
  • १९ जुलै १८८७ रोजी ज्योतीबांनी स्वतःचे मृत्युपत्र लिहीले.
  • १८८९ मध्ये मुंबई अधिवेशनात शेतकऱ्यांना राष्ट्रीय सभेमध्ये स्थान नसल्याने “राष्ट्रीय सभेमध्ये जो पर्यंत शेतकऱ्यांना जागा मिळत नाही. तो पर्यत राष्ट्रीय सभेस राष्ट्रीय म्हणुन घेण्याचा अधिकार नाही” असे उद्गार ज्योतीबांनी (Jyotiba Fule) काढले.
  • मुंबईचे गव्हर्नर व्हायकाऊंट फॉकलंड यांनी १८५२ साली ज्योतीबा फुले यांच्या शाळेस मासीक ७५ रु अनुदान मंजुर केले. तसेच ब्रिटीश काळात “दक्षिणा प्राईज फंडाद्वारे” ब्रिटीशांनी फुल्यांच्या स्त्री शिक्षणास दर महा २५ रु मदत केली.
  • वेदाचार” हे पुस्तक लिहीणारे धोंडीराम कुंभार यांनी प्रथम फुल्यांवर हल्ला केला व नंतर ते ज्योतीबांचे अनुयायी बनले.
  • १९२५ मध्ये पुणे नगर पालिकेचे सदस्य केशवराव जेधे यांनी महात्मा फुले यांचा पुतळा पुणे नगर पालिकेने बसवावा अशी प्रथम मागणी केली.
  • ०३ डिसेंबर २००३ रोजी संसदेच्या प्रांगणामध्ये महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळयाचे अनावरण करण्यात आले आहे.
  • १८८२ मध्ये ताराबाई शिंदे यांनी “स्त्री-पुरुष तुलना” हा ग्रंथ लिहीला. ताराबाईंच्या या ग्रंथातील विचारांना फुल्यांनी पाठींबा दर्शविला होता.
  • महात्मा फुले यांनी काव्यात्मक लेखन करताना ओव्यांना अभंग ऐवजी “अखंड” हे नाव दिले.
  • ज्योतीबा फुले यांना समाजातील ब्राम्हणवादी लोकांकडुन कलंक कसाई व ग्राम राक्षक असे संबोधले जाई.

महात्मा फुलेंची ग्रंथ रचना (jyotirao phule books) :

  • तृतीय रत्न :
  • १८५५ मध्ये “तृतीय रत्न” नाटक ब्राम्हण लोक कनिष्ठांना कसे फसवितात व ख्रिस्ती धर्म उपदेशक हे त्यांच्या अनुयायांना कसे सत्यमार्ग दाखवतात हे त्यांनी लोकांच्या सप्रमाण निदर्शनास आणले.
  • ब्राम्हणांचे कसब :
  • १८६८ मध्ये “ब्राम्हणांचे कसब” हा काव्यत्मक ग्रंथ लिहीला. या ग्रंथाची प्रस्तावना बाबा पद्मनजी यांनी केली.
  • छत्रतपी शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा :
  • १८६९ मध्ये छत्रतपी शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा लिहीला. यामध्ये ज्योतीबांना (Jyotiba Fule) स्वतःला “कुळवाडी भुषण” ही पदवी दिली आहे.
  • गुलामगिरी :
  • १८७३ मध्ये ज्योतीबांनी “गुलामगिरी” हा ग्रंथ प्रश्नोत्तर स्वरुपात लिहीला व तो अमेरीकेतील काळ्यालोकाना अर्पण केला.
  • शेतकऱ्यांचे आसुड :
  • १८८३ मध्ये त्यांनी “शेतकऱ्यांचे आसुड” हा ग्रंथ लिहुण शेतकऱ्यांच्या दुखःस वाचा फोडली. याच “विद्येविना मती गेली; मती विना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त विना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले” या महत्वपुर्ण ओव्या ज्योतीबांनी शेतकऱ्यांचे आसुड या ग्रंथात लिहुन शेतकऱ्यांना शिक्षणाचे महत्व समजून सांगण्याचा प्रयत्न केला.
  • अस्पृश्यांची कैफीयत :
  • १८८३ मध्ये ज्योतीबांनी “अस्पृश्यांची कैफीयत” हा ग्रंथ लिहीला.
  • इशारा :
  • १८८५ मध्ये ज्योतीबांनी “इशारा” या पुस्तकात जातीभेद बाबतचे विचार मांडण्यात आले होते.
  • सत्सार :
  • १३ जुन १८८५ रोजी ज्योतीबांनी “सत्सार” हे मासीक सुरु केले. या नियतकालीकातुन ब्राम्होसमाज व प्रार्थना समाजावर टिका करण्यात आली होती.
  • सार्वजनिक सत्यधर्म :
  • १८९१ मध्ये “सार्वजनिक सत्यधर्म” हा ग्रथ ज्योतीबांच्या (Jyotiba Fule) मृत्यू नंतर प्रकाशित झाला आहे. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा हेतू या ग्रंथामध्ये प्रतिपादीत केला आहे. तसेच या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी अर्थ सहाय्य केले. सत्यशोधक समाज संस्थेचे विचार “दीन बंधु” या साप्ताहीक मधुन व्यक्त केले जाई. सार्वजनिक सत्यधर्म हा “विश्व कुंटुबाचा जाहीरनामा” असे लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटले आहे. या ग्रंथास “सत्यशोधक समाजाचा बायबल” असे विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हटले आहे.
  • पुस्तक लिहताना त्यांना अपघात होऊन उजवा हात निकामी झाल्यामुळे डाव्या हाताने ग्रंथ पूर्ण केला.
  • १८७५ मध्ये न्या. रानडे यांनी पुण्यामध्ये आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांची मिरवणुक काढली या बावत ज्योतीबांनी रानडे यांना सहकार्य केले.
  • लोकमान्य टिळक व आगारकर यांच्या सामाजिक कार्यामुळे ज्योताबीना त्यांचा पुणे येथे सत्कार केला.

महात्मा फुलेंना मिळालेल्या पदव्या :

  • महात्मा फुले यांना “महाराष्ट्राचे मार्टींग ल्युथर किंग” ही पदवी शाहु महाराज यांनी दिली.
  • ज्योतीबांना “हिदुस्थानचा बुकर वाशिंग्टन” ही पदवी सयाजीराव गायकवाड यांनी दिली.
  • आध दलील उद्धारक, पतीतांचा पालनहार” असे उद्गार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी (Jyotiba Fule) फुले यांच्या बद्दल काढले.
  • लोक मुझे महात्मा कहते हैं, असली महात्मा तो ज्योतीबा थे |” असे उद्गार १९३२ साली महात्मा गांधी यांनी येरवड्याच्या तुरुंगातून काढले.
  • ज्योतीबा फुले हे कट्टर “एकेश्वरवादी” होते. एकेश्वरवादाची संकल्पना मांडताना “निर्गुण निराकार” आहे असे ते म्हणत. मुर्ती पुजेस त्यांचा पुर्णपणे विरोध होता. ज्योतीबा हे परमेश्वरास “निर्मीक” असे म्हणत.
  • ”हिंदू समाजातील बहुजन समाजात आत्मज्ञान व अत्मावलोकन निर्माण करणारा पहिला माणूस म्हणजे महात्मा फुले” तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी असे उद्गार काढले.
  • विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी त्यांना क्षुद्र जगद्गुरूशुद्धधर्म संस्थापक या पदवी बहाल केल्या.
  • विष्णुबुवा ब्रम्हचारी हे फुले यांचे समकालीन टिकाकार होते.
  • महात्मा फुलेंचा मृत्यू :
  • २८ नोव्हेंबर १८९० राजा ज्योतीबा फुले (Jyotiba Fule) यांचा मृत्यु पुणे येथे झाला.

आणखी वाचा

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here