शब्द्समुहाबद्दल एक शब्द | One word substitution

one word substitution

शब्द्समुहाबद्दल एक शब्द | One word substitution

विवध स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मराठी व्याकरणामध्ये परीक्षेत शब्द्समुहाबद्दल एक शब्द या प्रकारात हमखास तीन ते चार प्रश्न विचारल्या जातात त्याची तयारी करण्यासाठी उपयुक्त असे शब्द्समुहाबद्दल एक शब्द खाली दिलेले आहेत.

  • नक्की वाचा : 1. क्रियापद व प्रकार 2. अलंकार
शब्द्समुहाबद्दल एक शब्द :
 
क्र.
शब्द्समुह
शब्द
1
इच्छित वस्तू देणारी गाय
कामधेनू
2
इच्छिलेली वस्तू देणारा मणी
चिंतामणी
3
इतरांबरोबर बेपर्वाईने वागणारा
अरेराव
4
इतरांना मार्ग दाखवणारा
मार्गदर्शक
5
ईश्वर धर्म (देव) आहे असे मानणारा
आस्तिक
6
ईश्वर धर्म (देव) नाही असे मानणारा
नास्तिक
7
उदयाला येत असलेला
उदयोन्मुख
8
उपकाराची जाणीव ठेवणारा
कृतज्ञ
9
उपकाराची जाणीव न ठेवणारा
कृतघ्न
10
एकटा राहणारा
एकलकोंडा
11
एकाच काळातील
समकालीन
12
कधी न बदलणारे वाक्य
दगडावरची रेघ
13
कड्यावरून लोटण्याची शिक्षा
कडेलोट
14
कंटाळवाणे लांबलचक भाषण
एरंडाचे गुऱ्हाळ
15
कधीही जिंकला न जाणारा
अजिंक्य
16
कर्तव्यापासून तोंड फिरविलेला
कर्तव्य पराङ्मुख
17
कसलीच इच्छा नसलेला
निरिच्छ
18
कष्ट करून जगणारा
कष्टकरी
19
कधीही मरण नसणारा
अमर
20
कधीही नाश न पावणारा
अमीट,अविनाशी
21
कर्तव्यात तत्पर असणारा
कर्तव्यपरायण,कर्तव्य तत्पर
22
कमळाप्रमाणे डोळे असणारी
कामाक्षी,कमलनयन
23
कोणाच्याही पक्षात सामील न होणारा
अपक्ष
24
कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा
निःपक्षपाती,निष्पक्षपाती
25
कोणालाही कळू न देता
बिनबोभाट
26
कोणतेही काम करणारा
हरकाम्या
27
कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते तो
स्थितप्रज्ञ,स्थिरबुद्धी
28
कोणत्याही क्षेत्रात सर्वांगाने घडून येणारा बदल
क्रांती
29
कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता सेवा करणारा
निःस्वार्थी
30
कोणताही आधार नसलेला
अनाथ,निराधार
31
कोणतेही काम करण्याचा कंटाळा करणारा
आळशी
32
ज्याचा विसर पडणार नाही असा
अविस्मरणीय
33
ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असा
अनुपम,निरुपम
34
ज्याला कोणीही शत्रू नाही असा
अजातशत्रु
35
ज्याच्यापासून काहीही त्रास होत नाही असा
निरुपद्रवी
36
ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा
उपकृत
37
जाणून घेण्याची इच्छा असणारा
जिज्ञासा
38
ज्याचे बरोबर दुसऱ्याची तुलना करता येत नाही असे
अप्रतिम
39
ज्याच्यातून आरपार दिसू शकते अशी
पारदर्शक
40
ज्याला खूप माहिती आहे असा
बहुश्रुत
41
ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष
विधुर
42
ज्याच्या हातात चक्र आहे असा
चक्रपाणी,विष्णू,रमापती
43
ज्याला मरण नाही असा
अमर
44
ज्याचा उपाय हमखास लागू पडतो ते औषध
रामबाण
45
जाणून घेण्याची इच्छा
जिज्ञासू
46
ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात असा
अजानुबाहु
47
ज्याच्याजवळ अनेक कोटी रूपये आहेत असा
करोडपती
48
ज्या घराला छप्पर नसून वर चंद्र दिसतो असे मोडकळीस आलेले घर
चंद्रमौळी
49
ज्याला कोणत्याही गोष्टीची पारख नसते
गाजरपारखी
50
कानाला गोड वाटणारे
कर्णमधुर
51
लोकांचे नेतृत्व करणारा
नेता
52
सत्याचा आग्रह धरणारा
सत्याग्रही
53
दगडावर कोरलेला लेख
शिलालेख
54
कधीही न जिंकला जाणारा
अजिंक्य
55
लोकांची वस्ती नसलेला भाग
निर्जन
56
पसंत नसलेला
नापसंत
57
देवळाच्या आतील भाग
गाभारा
58
श्रम करून जगणारा
श्रमजीवी
59
कायमचे लक्षात राहणारे
अविस्मरणीय
60
जे होणे अशक्य आहे
असंभव
61
सर्व काही जाणणारा
सर्वज्ञ
62
दगडासारखे हृदय असणारा
पाषाण हृदयी
63
चहाड्या करणारा
चहाडखोर
64
जे माहीत नाही ते
अज्ञात
65
कहीही न शिकलेले
अशिक्षित
66
दुसर्यावर उपकार करणारा
परोपकार
67
रोज घडणारी हकीकत
दैनंदिनी
68
दुसर्यांना मार्गदर्शन करणारा
मार्गदर्शक
69
सभेत धीटपणे बोलणारा
सभाधीट
70
दररोज प्रसिद्ध होणारे
दैनिक
71
आठवड्यातून प्रसिद्ध होणारे
साप्ताहिक
72
पंधरवड्यातील प्रसिद्ध होणारे
पाक्षिक
73
महिन्यातून प्रसिद्ध होणारे
मासिक
74
वर्षातून प्रसिद्ध होणारे
वार्षिक
75
पाण्याने चहूबाजूंनी वेढलेले
द्वीप
76
काहीही माहेत नसलेला
अनभिज्ञ
77
कलेची आवड असणारा
कलावंत
78
विक्री करणारा
विक्रेता
79
अजिबात शत्रू नसणारा
अजातशत्रू
80
आई वडील नसणारा
अनाथ
81
देवावर विश्वास ठेवणारा
आस्तिक
82
चार रस्त्यांचा समूह
चौक
83
झोपेच्या आधीन
निद्राधीन
84
उपकार न जाणारा
कृतघ्न
85
लहानापासून थोरांपर्यन्त
आबालवृद्ध
86
पाहण्यासाठी जमलेले लोक
प्रेक्षक
87
मनास आकसून घेणारे
मनमोहक
88
गुरे बांधण्याची जागा
गोठा
89
घोड़े बांधण्याची जागा
पागा
90
पाहिल्याबरोबर लगेच
प्रथमदर्शनी
91
जन्मापासून मरेपर्यन्त
आजन्म
92
कधीही मृत्यू न येणारा
अमर
93
उपकार जाणणारा
कृतज्ञ
94
संख्या मोजता न येणारा
असंख्य,अमाप
95
मिळून मिसळून वागणारा
मनमिळाऊ
96
विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा
वसतिगृह
97
गुप्त बातम्या कढणारा
गुप्तहेर
98
कोणतीही तक्रार न करता
विनातक्रार
99
सतत द्वेष करणारा
दीर्घद्वेषी
100
कविता करणारी
कवयित्री
101
किल्ल्याच्या सभोवतालची भिंत
तट
102
केवळ स्वतःचाच फायदा करू पाहणारा
स्वार्थी
103
कैदी ठेवण्याची जागा
तुरुंग
104
खूप दानधर्म करणारा
दानशूर
105
खूप आयुष्य असणारा
दीर्घायुषी
106
खूप पाऊस पडणे
अतिवृष्टी
107
गुरे राखणारा
गुराखी
108
घरदार नष्ट झाले आहे असा
निर्वासित
109
घरापुढील मोकळी जागा
अंगण
110
घरे बांधणारा
गवंडी
111
चार रस्ते एकत्र येतात ती जागा
चौक
112
चांदण्या रात्रीचा पंधरवडा
शुक्लपक्ष
113
चित्रे काढणारा
चित्रकार
114
जमिनीवर राहणारे प्राणी
भूचर
115
जादूचे खेळ करून दाखवणारा
जादूगार
116
जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे भासणे
आभास
117
जेथे वस्तू विकल्या जातात ती जागा
दुकान
118
ज्याचे वर्णन करणे शक्य नाही ते
अवर्णनीय
119
ज्याचे कधी विस्मरण होत नाही ते
अविस्मरणीय
120
ज्याला कधी म्हातारपण येत नाही असा
अजर
121
ठरावीक काळाच्या अंतराने प्रकाशित होणारे
नियतकालिक
122
एकत्र येतात ती जागा
तिठा
123
झाडांची निगा राखणारा
माळी
वरीलप्रमाणे शब्द्समुहाबद्दल एक शब्द यांचा अभ्यास आपण केला आहे.
 
नक्की वाचा : शब्दांच्या जाती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here