मराठी म्हणी व वाक्प्रचार | मराठी

marathi mhani

रोजच्या जीवनामध्ये आपण सहजपणे बोलताना कितीतरी मराठी म्हणींचा उपयोग करतो याच मराठी म्हणींचा व वाक्प्रचारांचा स्पर्धा परीक्षेची अभ्यास करताना मराठी व्याकरणामध्ये मराठी म्हणी व वाक्प्रचार या घटकाचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. मराठी म्हणी व वाक्प्रचार या घटकावर परीक्षेमध्ये हमखास दोन ते तीन प्रश्न नक्कीच विचारल्या जातात. त्यांचा चांगल्याप्रकारे अभ्यास करण्यासाठी खालील मराठी म्हणी व वाक्प्रचार हे नक्कीच आपल्या सर्वांना उपयुक्त पडतील.

मराठी म्हणी व वाक्प्रचार :

क्रमांक 1 ते 25 :

  • उंटावरून शेळ्या हाकणे : आळस, हलगर्जीपणा,टाळाटाळ करणे
  • असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ : दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवलाही धोका निर्माण होऊ शकतो
  • असतील शिते तर जमतील भूते : एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्याजवळ माणसे गोळा होतात.
  • आग रामेश्वरी अन बंब सोमेश्वरी : रोग एकीकडे उपपाय दुसरीकडे करणे
  • कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही : क्षुद्र माणसांच्या निंदेणे थोरांचे नुकसान होत नाही
  • कोल्हा काकडीला राजी : लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात,अल्प संतुष्टी असणे
  • रात्र थोडी सोंगे फार : काम भरपूर पण वेळ मात्र खूप कमी
  • अति शहाणा त्याचा बैल रिकामा : अति शहाणपणाने नेहमी नुकसान होते
  • शेरास सव्वाशेर : प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ ठरणे
  • नाकाचा बाल : अत्यंत प्रिय / जिवलग व्यक्ती
  • नाकापेक्षा मोती जड : डोईजड असणे
  • तोंड दाबून बुक्क्यांचा मार : नाहक जुलूम/अत्याचार सहन करावा लागणे
  • नावडतीचे मीठ अळणी : नावडत्याने काहीही चांगले केले तरी ते न आवडणे
  • अंथरूण पाहून पाय पसरावे : ऎपत पाहून खर्च करणे
  • उंटावरचा शहाणा : मूर्ख सल्ला देणारा माणूस
  • अडला हरी गाढवाचे पाय धरी : अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी / विनवणी करावी लागणे.
  • नाचता येईना अंगण वाकडे : ज्याला स्वत:स चांगले काम येत नसताना दुसऱ्याचे दोष काढणारा व्यक्ती
  • पी हळद हो गोरी : कोणत्याही बाबतीत अतिशय उतावळेपणा दाखविणे.
  • मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही : प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय काहीच कळत नाही.
  • बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर : दोनपैकी एकतरी पर्याय निवडणे
  • चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे : जीवनात प्रत्येकाची वेळ केंव्हातरी येतच असते.
  • आंधळा मागतो एक डोळा अन देव देतो दोन डोळे : अपेक्षा न केलेल्या गोष्टी सुद्धा प्राप्त होणे
  • छत्तीसाचा आकडा : विरुद्ध मत किंवा स्वभाव असणे
  • तेरड्याचा रंग तीन दिवस : एखादे कार्य फार थोडा काळ जोरात चालून नंतर एकदम बंद पडणे
  • दुष्काळात तेरावा महिना : संकटात अधिक भर घालणे

क्रमांक 26 ते 50 :

  • नव्याचे नऊ दिवस : नवेपणा असतानाचे कौतुक फारकाळ टिकत नाही.
  • एका हाताने टाळी वाजत नाही : दोष दोन्हीकडे सारख्या प्रमाणात असतो
  • पालथ्या घड्यावर पाणी : सर्व प्रयत्न उपयोग शून्य ठरणे.
  • वासरात लंगडी गाय शहाणी : अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा व्यक्ती शहाणा ठरणे
  • आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना : दोन्ही बाजूंनी सारखी अडचण निर्माण होणे. वाचा : शब्दांच्या जाती
  • कामापुरता मामा : काम साधण्यापुरते गोड बोलणे व नंतर विसरून जाणे
  • आधी पोटोबा मग विठोबा : अगोदर पोट भरावे मग देवास पुजावे
  • काखेत कळसा गावाला वळसा : वस्तू स्वत:पाशी असताना इतरत्र शोधत राहणे
  • झाकली मूठ सव्वा लाखाची : दुर्गुण असले तरी प्रकट न करणे
  • पायीची वहाण पायी बरी : प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे त्याला वागवने
  • मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये : एखाद्याच्या चांगुलपणाचा जास्त फायदा घेऊ नये
  • गाढवाला गुळाची चव काय : अडाणी, मूर्ख माणसाला चांगल्या गुणाचे कौतुक नसते
  • घोडा मैदानजवळ असणे : लवकरच परीक्षा होणे
  • डोंगर पोखरून उंदीर कढणे : केलेल्या श्रमापेक्षा अल्प फायदा होणे
  • भरंवशाच्या म्हशीला टोणगा : पूर्ण निराशा होणे
  • वरातीमागून घोडे : एखादी गोष्ट करून झाल्यावर तिची साधने जुळवणे
  • पाण्यात राहून माशाशी वैर : बलवानाशी शत्रुत्व काय करू नये
  • खायला काळ भुईला भार : ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस,आळशी माणूस
  • तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले : दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या निघून जाणे
  • गर्वाचे घर खाली : गर्वाचा किंवा अभिमानाचा अतिरेक केल्यास त्याचा परिणाम वाईट होत असतो.
  • गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ : मुर्ख माणसे एकत्र जमली की त्यांच्या हातून वाईट कृत्ये होणारच.
  • गुरूची विद्या गुरूलाच : दुसऱ्यांना फसविण्याचा प्रयत्न केल्यास एकदिवस स्वतःची फसगत होणे.
  • गूळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी : गरजवंताला पैशाची मदत करणे अशक्य असले तरी गोड बोलणे शक्य असावे.
  • नाव मोठे लक्षण खोटे : कीर्ती मोठी पण कृती मात्र छोटी
  • हपापाचा माल गपापा : इतरांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होणे

नक्की वाचा : शब्दांच्या जाती

क्रमांक 51 ते 75 :

  • आपली पाठ आपणास दिसत नाही : स्वत: चे दोष स्वत: स कधीच  लक्षात येत नाहीत .
  • तळेराखी तो पाणी चाखी : ज्याच्याकडे वस्तु रक्षणासाठी दिलेली असते , तो तिचा उपभोग घेणारच
  • डोळ्यात केर आणि कानात फुंकर : रोग एक अन उपाय वेगळाच करणे
  • बैल गेला अन झोपा केला : एखादी गोष्टा घडून गेल्यावर प्रयत्न करणे
  • विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर : फक्त गरजेपुरती साधने/ गोष्टी घेऊन जाणे.
  • राजाला दिवाळी काय माहीत ? : नित्य घडणाऱ्या गोष्टीचे नावीन्य वाटत नाही
  • बुडत्याचे पाय खोलात : अधोगतीस लागून अधिकच खाली जाणे
  • अती झालं अन हसू आलं : एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती त्रासदायक होतेच
  • अती परीचयात आवज्ञा : जास्त जवळीकता अपमानित करू शकते
  • आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास : मुळातच आळशी असणाऱ्या माणसासाठी त्याच्या आळशी स्वभावाला पोषक असे वातावरण निर्माण होणे.
  • आजा मेला नातू झाला : एखादे नुकसान झाले असता , त्याच वेळी दुसरीकडे एखादा फायदा होणे
  • आत्याबाईला मिश्या असत्या तर ? : नेहमी एखाद्या कामात जर तर या शब्दाचा विचार करणे
  • आपला तो बाळ्या, दुसऱ्याच ते कार्ट : स्वतःच्या प्रिय व्यक्ती  बाबतीत असलेले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवणे
  • आपलेच दात अन आपलेच ओठ : आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीच निर्माण होणे
  • आयजीच्या जीवावर बायजी उदार : दुसऱ्याच्या पैसा खर्च करून मिजाज दाखवणे
  • आयत्या बिळात नागोबा : दुसर्याने केलेल्या गोष्टीचा फायदा घेणे
  • आलीया भोगासी असावे सादर : तक्रार न करता प्रसंगाला सामोरे जाणे
  • आळश्याला गंगा दूर : आळशी माणसाला क्षुल्लक गोष्टी सुद्धा कठीण वाटतात
  • आवळा देवून कोहळा काढणे : लहान अमिश देऊन मोठा फायदा करून घेणे
  • अंगापेक्षा बोंगा जास्ती : मूळ गोष्टीपेक्षा तिच्या आनुषंगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे
  • अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज : गरजू माणसाला अक्कल नसते
  • अंगावरचे लेणे, जन्मभर देणे : दागिण्या करिता कर्ज काढून ते आयुष्यभर फेडत राहणे
  • अंधळं दळतं अन कुत्र पिठ खातं : काम एकाने करावे आणि फायदा मात्र दुसऱ्याच व्यक्तीने घेणे

मराठी म्हणी व वाक्प्रचार :

क्रमांक 76 ते 100 :

  • अंधारात केले पण उजेडात आले : कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती उघडकीस आल्याशिवायराहत नाही
  • अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी : स्वतःचा दोष मान्य न करता ती दुसऱ्याच्या माथी मारणे
  • अडली गाय खाते काय : एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला आणखी त्रास देने
  • अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे : नाव मोठे पण लक्षण मात्र खोटे
  • अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था : अशक्य कोटीतील गोष्ट घडून येणे
  • जुने ते सोने : जुन्या वस्तु चांगल्या व उपयुक्त असतात
  • गाढवाने शेत खाल्ल्यास पाप न पुण्य : निरुपयोगी माणसावर केलेले उपकार एकदिवस व्यर्थ जातातच
  • गाव जाळला , मारुति नामा निराळा : दुसऱ्याचे नुकसान करून अलिप्त होणे
  • भीक नको पण कुत्रा आवर : उपकार नकोत , पण त्रास देऊ नको
  • दाम करी काम : पैशाच्या मदतीने काम होणे
  • ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी : एकाच गावात राहणारे परस्परांना चांगलेच ओळखून असतात
  • बावळी मुद्रा ,देवळी निद्रा : दिसण्यात बावळा पण व्यवहारात अतिशय चतुर असलेला माणूस
  • थेंबे थेंबे तळे साचे : कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठविल्याने तिचा संचय होतो/ वाढत जाते
  • उथळ पाण्याला खळखळाट फार : अल्प ज्ञान, पण ताठा फार मोठा असणे
  • दृष्टी आड सृष्टी : आपल्या मागे काय चालते , ते दिसत नाही
  • बोले तैसा चले त्याची वंदावी पाऊले : बोलण्याप्रमाणे कृती करणारयास मान मिळतो
  • कांनामागून आली नि तिखट झाली : मागून येऊन वरचढ होणे
  • आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला : ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्यांना हसतो तो दोष स्वतःमध्ये असणे
  • ये रे कुत्र्या खाय माझा पाय : स्वतःहून अंगावर संकट ओढवून घेणे
  • साखरेचे खाणार त्याला देव देणार : जो चांगली ईच्छा मनात ठेवतो , त्याला चांगला लाभ होणारच
  • उंदराला मांजर साक्ष : एकमेकांचे हितसंबंध असलेले दोघेही एकमेकांचे साक्षीदार असण्याची परिस्थिती असते
  • उखळात डोके घातल्यावर मुसळाला कोण भितो ? : येईल त्या संकटाला तोंड देण्याची तयारी असलेला व्यक्ती कोणत्याच संकटाला घाबरत नाही.

नक्की वाचा : मराठी प्रयोग

क्रमांक 101 ते 125 :

  • एक ना धड भाराभर चिंध्या : एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यास त्यातले एकही काम न होता सर्व विस्कळीत होणे
  • एका माळेचे मणी : सगळे सारखेच असणे
  • करावे तसे भरावे : केलेल्या दुष्कृत्यास तशीच शिक्षा होणारच
  • कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ : आपलीच माणसे आपल्या नाशास कारणीभूत ठरणे
  • कुंपणानेच शेत खाल्ले : ज्याच्या हाती एखाद्या गोष्टीचे रक्षण करण्याचे काम दिले तर त्याने रक्षण न करता नुकसान करणे.
  • केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी : अत्यंत दारिद्र्याची स्थिती निर्माण होणे
  • ओ म्हणता ठो येईना : निरक्षर व्यक्ती
  • कर नाही त्याला डर कशाला ? : ज्याने वाईट काम केलेच नाही त्याला भीती वाटण्याचे काहीच कारण नाही.
  • कसायाला गाय धार्जिण : कठोर व दुष्ट मालकाशी नोकर नारमाईने वागतात, पण गरीब मालकाची मात्र हेळसांड करतात.
  • कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच : ज्याचा स्वभाव जन्मतः बाईट असेल तर तो तसाच राहणे
  • कानावर हात ठेवणे : आपल्याला घडलेल्या गोष्टीबद्दल काहीच माहीत नाही असा भाव व्यक्त करणे.
  • खऱ्याला मरण नाही : खरी गोष्ट कधीही कोणीही दडवून ठेऊ शकत नाही. ती कधीतरी उघडकीस येतेच.
  • खाण तशी माती : तसेच आई वडिलाप्रमाणेच त्यांची मुले असतात
  • खाई त्याला खवखवे : जो कोणी अपराध करतो त्याला त्याची सारखी जाणीव होऊन तो नेहमी अस्वस्थ राहतो.
  • खाजवून अवधान आणणे : आपल्याच हाताने आपल्या जिवाला त्रास निर्माण करून घेणे
  • गरजवंताला अक्कल नसते : एखाद्या संकटात सापडलेल्या गरजवंताला दुसऱ्यांचे वाईट बोलणेही ऐकून घेणे भाग असते. वाचा : मराठी प्रयोग
  • गरज सरो वैद्य मरो : गरज असे पर्यंतच एखाद्याची आठवण ठेवणे, गरज संपली की त्याला विसरून जाणे.
  • गवयाचे पोर रडले तरी सुरातच रडणार : आई वडिलांचे संस्कार/गन नेहमी मुलांमध्ये येतात.
  • गर्जेल तो पडेल काय? : केवळ निरर्थक बडबड करणाऱ्या माणसाच्या हातून कोणतेही कार्य होऊ शकेत नाही
  • गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य : दोघे दिसायला भिन्न असले तरी त्यांचे मूळ एकच असणे.
  • गोरागोमटा कपाळ करंटा : दिसण्यात सुंदर पण कमनशिबी
  • घरोघरी मातीच्या चुली : सामान्यपणे पसगळीकडे सारखीच परिस्थिती असते.

मराठी म्हणी व वाक्प्रचार :

क्रमांक 126 ते 150 :

  • लग्नाला गेली आणि बारशाला आली : दिलेल्या वेळेपेक्षा अतिशय उशिराने पोहोचणे
  • लंकेत सोन्याच्या विटा : दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग होत नसतो.
  • लाज नाही मला कोणी काही म्हणा : निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची कधीच पर्वा करत नाही
  • लेकी बोले सुने लागे : एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे
  • लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण : इतरांना उपदेश करायचे पण स्वतः मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही
  • वळणाचे पाणी वळणावर जाणे : निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडणारच
  • वरातीमागून घोडे : योग्य वेळ निघून गेल्यावर एखादे काम करणे
  • वारा पाहून पाठ फिरविणे : परिस्थिती पाहून वर्तनात वादळ करणे
  • वाहत्या गंगेत हात हात धुणे : साधने अनुकूल असताना होईल तो फायदा पदरात पडून घेणे
  • वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातोच : वाईट व्यक्तीला चांगले म्हटले तरी त्रास आणि वाईट म्हटले तरी त्रास होणे.
  • विचाराची तूट तेथे भाषणाला उत : मूर्खांच्या गर्दीत नेहमी नुसती निरर्थक बडबड असते
  • रडत राऊत रडत राव घोड्यावर स्वार : स्वतःची इच्छा नसताना एखादी जबाबदारी अंगावर पडणे
  • रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत : एखाद्या कामामध्ये मुख्य गोष्टीचा अभाव असणे
  • राईचा पर्वत करणे : मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असताना तिचा विपर्यास किंवा बडेजाव करून सांगणे
  • राज्याचे घोडे आणि खासदार उडे : वस्तू एकाची पण त्यावर मिजास मात्र दुसऱ्याची असणे
  • रोज मरे त्याला कोण रडे : तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य नष्ट होऊन जाणे
  • घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात : कुटुंबातील प्रमुख पुरूषावर संकट ओढवले तर त्याच्या कुटुंबातील इतरांवर त्याचा परिणाम होणारच.
  • लग्नाला वीस तर वाजंत्री ला तीस : मुख्य कार्य पेक्षा निरर्थक बाबींवर खर्च करणे लष्कराच्या भाकर्‍या भाजणे : बिन फायद्याचा आणि निरर्थक उद्योग करत राहणे
  • लकडी दाखविल्या शिवाय मकडी वळत नाही : धाक दाखविल्याशिवाय शिस्त लागत नाही.

2 COMMENTS

  1. चांगले संकलन पण बेताचे
    यात मुख्यतः नागरी म्हणी आहेत
    गावाकडच्या व ग्रामीण म्हणी ही याच्यात असाव्यात अशी अपेक्षा

    • आपण दिलेल्या सूचना आमच्यासाठी मोलाच्या आहेत, आम्ही नक्की यावर काम करू. धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here